Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


नोटाबंदीनंतर बेहिशेबी चार लाख कोटी बँकांमध्ये जमा?


Main News

नवी दिल्ली, दि. ११ (पीसीबी) - नोटाबंदीनंतर बँक खात्यांतील जमा रकमेत प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून, यातील सुमारे तीन ते चार लाख कोटी रक्कम प्राप्तिकर चुकवून जमा केलेली असावी, असा कयास सरकारने व्यक्त केला आहे.  ही रक्कम ५०० व १००० च्या रद्द नोटांच्या स्वरूपात बँकांतून जमा केली गेली आहे. अशा प्रकारे अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर जमा झालेल्या रकमेची चौकशी करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाला देण्यात आले आहेत. यातील बव्हंशी रक्कम कर चुकवून जमवलेली असण्याची शक्यता गृहित धरून ही रक्कम भरणाऱ्या जमाकर्त्यांना प्राप्तिकर विभाग नोटिसा पाठवणार आहे. 

सरकारकडे नोटाबंदीच्या ५० दिवसांतील बँकांच्या जमा रकमेची प्रचंड माहिती जमा झाली असून, त्यातूनच सरकारला दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम तब्बल ६० लाख बँक खात्यांतून भरली गेल्याची माहिती मिळाली आहे. या खात्यांत एकूण ७.३४ लाख कोटी रुपये रक्कम भरली गेल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक खात्यात दोन ते अडीच लाख रुपये याप्रमाणे ४२ हजार कोटी रुपये भरण्यात आलेल्या खात्यांचे पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक किंवा पत्ते प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध आहेत.

९ नोव्हेंबरनंतर...
ईशान्येकडील राज्यांतील बँक खात्यांत १० हजार ७०० कोटी जमा, सहकारी बँकांतून १६ हजार कोटी रुपये जमा, निष्क्रिय बँक खात्यांतून २५ हजार कोटी रुपये जमा, ५०० व १०००च्या रद्द नोटांच्या रूपात कर्जांची मोठ्या प्रमाणावर फेड झाली. त्यातून ८० हजार कोटी रुपये बँकांत जमा.

रिझर्व्ह बँकेने झटकले हात
नोटाबंदी ही सरकारची कल्पना होती आणि त्यानुसार रिझर्व्ह बँकेला ५०० व १०००च्या नोटा जमा करून घेण्यास ७ नोव्हेंबर २०१६ रोजी सांगण्यात आले, असा दावा रिझर्व्ह बँकेने केला आहे. याविषयी भूमिका स्पष्ट करण्यारे सात पानी पत्र एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय आर्थिक समितीला रिझर्व्ह बँकेने पाठवले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin