Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


सनई चोरीप्रकरणी बिस्मिल्ला खान यांच्या नातवाला अटक


Main News

वाराणसी, दि. १० (पीसीबी) - 'भारतरत्न' उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून चोरीला गेलेल्या चांदीच्या शहनाईंचा (सनई) उलगडा झाला आहे. या चोरीप्रकरणी उत्तर प्रदेश एसटीएफच्या वाराणसी युनिटने दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या नातवासह अन्य दोन सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ पैकी ४ शहनाई  जप्त केल्या आहेत.

एसटीएफने जप्त केलेल्या शहनाईंमध्ये एका चांदीच्या शहनाईचा समावेश आहे. दिवंगत उस्ताद बिस्मिल्ला खान यांचे नातू नजरे हसन शादाब याच्यासह सोने-चांदीचे व्यापारी असलेल्या बाप-लेकाला अटक केली आहे. शंकर लाल शेट आणि सुजीत शेठ असे आरोपीचे नाव आहे.

उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या घरातून पाच शहनाई (सनई) चोरीला गेल्या होत्या. या शहनाई उस्ताद यांच्या मूळ गावातील घरातून चोरीला गेल्या होत्या. याची ५ डिसेंबर रोजी उस्ताद बिस्मिल्ला यांचा मुलगा काझीम यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. या चोरीप्रकरणात भाऊ नाझिमचा हात असल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती. दोन्ही भावात संपत्तीवरुन वाद सुरू आहे. चांदीच्या शहनाईमध्ये एक शहनाई माजी पंतप्रधान नरसिंह राव तर दुसरी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव, तिसरी माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी भेट म्हणून उस्ताद बिस्मिल्ला खान यांना दिली होती.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin