Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


भारत डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर - नरेंद्र मोदी


Main News

गांधीनगर, दि.१० (पीसीबी) - भारत हा जगातील सर्वात मोठी डिजिटल अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. सरकार भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणांसाठी कटिबद्ध असून जागतिक मंदीच्या काळातही भारताने चांगला विकास केला आहे. त्यामुळे भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील चमकदार बिंदू बनला आहे. आगामी काळात ‘मेक इन इंडिया’ हा भारताचा सर्वात मोठा ब्रँड बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला.  

गांधीनगर येथे ८ व्या व्हायब्रंट गुजरात परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात मोदी बोलत होते. चार दिवसांचे व्हायब्रंट गुजरात समिट महात्मा गांधी मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. 

या परिषदेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी, रतन टाटा यांच्यासह उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी जिओ गुजरातमधील रूग्णालये व वैद्यकीय सुविधा, महाविद्यालये आणि शाळांना ‘जिओ’च्या माध्यमातून जोडणार असल्याची घोषणा केली. 

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरात समिट आयोजित करण्यास सुरूवात केली होती. या समिटचे १२ देश भागीदार आहेत. समिटमध्ये जवळपास २० राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्रीसह जगभरातील अनेक देशातील प्रमुख यात सहभाग घेणार आहेत. याबरोबर भारत-अमेरिकेच्या परदेश संबंधाविषयी सहाय्यक मंत्री निशा देसाई बिस्वालही प्रतिनिधीमंडळासह उपस्थित राहणार आहेत. 

समिटमध्ये केनियाचे अध्यक्ष उहुरू केन्याता, रवांडाचे अध्यक्ष पॉल कगामे, पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा आणि सर्बियाचे पंतप्रधानही सहभागी होणार आहे. अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, कॅनाडा, डेन्मार्क, फ्रान्स, जपान, पोलँड, सिंगापूर, स्वीडन आणि युएई हे या समिटचे भागीदार देश आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin