Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


ड्युटीवर मोबाईल ठेवणाऱ्या त्या जवानाची चौकशी


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बीएसएफने कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. मोबाईल जवळ बाळगण्याची मनाई असतानाही मोबाईल जवळ ठेवल्याप्रकरणी बीएसएफचा जवान तेजबहादूर यादव याची चौकशी करण्यात येणार असल्याचे बीएसएफने स्पष्ट केले.
 
बीएसएफचे महासंचालक डी.के. उपाध्याय यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. बीएसएफमध्ये मोबाईल आणण्यास मनाई आहे. असे असतांना त्याने मोबाईल आणलाच कसा? याचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे उपाध्याय म्हणाले.
 
जवानांना देण्यात येणारे जेवण रूचकर नसेल. त्याच्याशी मी सहमत आहे. पण जवानांनी त्याबाबत कधी तक्रार केली नाही. असे सांगतांनाच थंडीमुळे अनेकदा जेवण बेचव लागते. तरिही जवान तक्रार करत नाहीत, असे उपाध्याय यांनी स्पष्ट केले. तेजबहादूर यांच्या तक्रारी पुर्वी अनेकदा उपमहासंचालकाच्या स्तरावर छावण्यांची पाहणी करण्यात आली आहे. पण कोणताही तक्रार आढळून आली नाही, असेही त्यांनी निर्दशनास आणून दिले.
 
२०१० मध्ये शिस्तभंगाची कारवाई म्हणून यादवचे कोर्ट मार्शल करण्यात येणार होते. पण त्याच्या कुटूंबियांची परिस्थिती पाहून त्याला निलंबित केले नाही, असेही ते म्हणाले. त्याच्यावर कोणताही दबाव येऊ नये आणि त्याची योग्य चौकशी व्हावी म्हणूनच त्याला छावणीतून हेड क्वॉर्टरला पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin