Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


भिम अॅप १० दिवसात १ कोटी लोकांकडून डाऊनलोड


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी)  - कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भिम अॅप लॉन्च केले. या अॅपला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या १० दिवसात तब्बल १ कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकातून दिली आहे. 
 
भिम अॅपमुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे आणि जलदगतीने होत आहेत. त्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्यास तरूणांचीही पसंती आहे आणि म्हणूनच अॅप तरूणांमध्ये लोकप्रिय झाल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. हे अॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे मात्र, लवकरच आयफोनसाठी देखील उपलब्ध होणार आहे.
 
असे वापरा भिम अॅप ?
गूगल प्ले स्टोअरमधून  NPCI डेव्हलपर्स असलेले भिम अॅप डाउनलोड करा.
- प्ले स्टोअरला BHIM सर्च केल्यानंतर खरं अॅप सर्वात वरती असेल
- त्यानंतर तुमची भाषा निवडा 
- व्हेरिफिकेशनसाठी फोन नंबर द्या आणि व्हेरिफिकेशनसाठी थोड्यावेळ वाट बघा 
- व्हेरिफिकेशननंतर पासवर्ड सेट करा आणि तुमची बँक निवडा
- जर तुमच्याकडे यूपीआय नंबर असेल तर मोबाईल नंबरच्या मदतीने माहिती आपोआप घेतली जाईल नसेल तर यूपीआय पिन तयार करा  (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
- यासाठी युजर नेमच्या जागी आपला मोबाईल नंबर टाका
- तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल
- सेंड, रिक्वेस्ट आणि स्कॅन अँड पे, हे तीन पर्याय मेन मेन्यूमध्ये आपल्याला तीन दिसतील
- पैसे पाठवण्यासाठी ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा यूपीआय नंबर टाकावा
- त्यानंतर किती रक्कम पाठवायची आहे ते टाकावे, नंतर कोणताही रिमार्क टाकावा
- यानंतर आपला यूपीआय पिन टाका आणि रिक्वेस्ट बॅलेन्ससाठी क्लिक करा. यासोबतच तुमचे ट्रान्जेक्शन पूर्ण होईल.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin