Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


देशातील ४१ हजार पेट्रोल पंपावर पेटीएमद्वारे व्यवहाराची सुविधा


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – भारतात तब्बल ४१ हजार पेट्रोल पंपावर आता पेटीएमद्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. नोटाबंदीनंतर चर्चेत आलेल्या पेटीएम या पेमेंट अॅपने पेट्रोल पंपासोबत करार केला आहे. यामुळे ग्राहकांजवळ रोकड किंवा कार्ड नसेल तरी व्यवहार सुरळीत होतील. पेटीएमसोबत झालेल्या कराराचे पेट्रोल पंप चालकांनी स्वागत केले आहे. सध्या देशभरात कॅशलेस व्यवहाराचे वारे वाहत आहे. त्या पार्श्वभूमीवर पेटीएमच्या वापरामध्ये २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पेट्रोल पंपावर बहुतांश पीओएस मशीन या एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अक्सिस बँकांनी पुरवलेल्या आहेत. पेट्रोल भरल्यानंतर कार्डचा वापर झाल्यास त्यावर १ टक्का अतिरिक्त शुल्क लागेल, अशी नोटीस बँकांनी पाठवली होती. एकीकडे कॅशलेस व्यवहारांना प्रेरणा मिळावी म्हणून सरकार विविध उपाययोजना आणत आहे. तर दुसऱ्या बाजूला बँका आमच्यावर कर लादत आहे असे म्हण्त ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने कार्ड व्यवहार करणार नसल्याचे ठणकावून सांगितले होते. यामध्ये केंद्र सरकारलाच हस्तक्षेप करावा लागला. कार्ड्च्या व्यवहारावर कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही, असे पेट्रोल मंत्रालयाने स्पष्ट केल्यानंतर हा वाद निवळला 

तरीदेखील कार्ड व्यवहारावरील अतिरिक्त कराचा भुर्दंड कुणावर येऊन पडेल याबाबत एकमत होत नव्हते. या पार्श्वभूमीवर पेटीएमने पेट्रोल पंपांसमोर योग्य प्रस्ताव ठेवला अणि हा प्रस्ताव पेट्रोल पंपानी स्वीकारला, असे पेटीएमचे उपाध्यक्ष किरण वासी रेड्डी यांनी म्हटले. आमच्या सेवा या अतिशय उपयुक्त असून वापरण्यास देखील सोप्या असल्याचे वासी रेड्डी यांनी म्हटले. या ‌व्यतिरिक्त देशातील सुमारे २०० गावे कॅशलेस व्हावी, याकरिता पेटीएम काम करत आहे.

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin