Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार समजून मतदान करण्याचे आवाहन


Main News

मोहाली, दि. १० (पीसीबी) - पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'आम आदमी पार्टी'ने केजरीवाल कार्ड वापरण्याचे ठरवल्याचे दिसत आहे. राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. 

मोहालीत आयोजित केलेल्या सभेत  मनीष सिसोदिया बोलत होते. यावेळी त्यांनी केजरीवाल पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार समजून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले.  
 
सिसोदिया सभेतील भाषणादरम्यान म्हणाले की, 'तुम्ही असे समजा की पंजाबचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालच बनणार आहेत. पंजाबचा मुख्यमंत्री कुणीही होवो, तरी जी आश्वासने दिली जात आहेत ती पूर्ण करणे केजरीवाल यांची जबाबदारी आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना मत देत आहात असे समजून मतदान करा', असेही पुढे सिसोदिया म्हणाले. 

मनीष सिसोदिया यांनी केलेल्या या विधानावरुन 'आम आदमी पार्टी' पंजाब विधानसभा निवडणुकीच्या लढाईत केजरीवाल यांचे नाव वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.  तर दुसरीकडे, आगामी काळात केजरीवाल राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद खरेच सोडणार आहेत का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin