Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ भाजपचा प्रचार करणार


Main News

लखनौ, दि. १० (पीसीबी) - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच आता अभिनेत्यांचाही आधार घेण्याची रणनिती आखली आहे. अभिनेता अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपचा प्रचार करणार आहेत.

अर्जुन रामपाल आणि जॅकी श्रॉफ हे दोघेही भाजपसाठी प्रचार करणार आहेत. सुरुवातीला हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र अर्जुन रामपालने सक्रीय राजकारणात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘मी काही राजकारणी नाही, मी राजकारणासाठी इथे आलो नाही. मी फक्त भाजपला कसा पाठिंबा देता येईल यासाठी इथे आलो’ असे त्याने सांगितले. उत्तरप्रदेशमध्ये पत्रकारांशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली. 

जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल या दोघांनीही आज भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. या भेटीत उत्तर प्रदेश निवडणुकीतील प्रचार करण्याचे या दोघांनी सांगितले. केवळ पक्षाचा प्रचार करण्यापेक्षा भाजपमध्येच सामिल होण्याचे आवतनही भाजपने या दोघांना दिल्याचे समजते. जॅकी श्रॉफ आणि अर्जुन रामपाल यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारातही उतरविण्याची रणनिती भाजप आखत असल्याचे सुत्रांनी सांगितले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin