Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


मोदीबाबू हे प्लॅस्टिक मनीचे विक्रेते - ममता बॅनर्जी


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - नोटाबंदीचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेचा नसून सरकारच्या ‘सूचने’वरून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदीबाबू हे प्लॅस्टिक मनीचे विक्रेते (सेल्समन) बनले आहेत. मात्र, लोक प्लॅस्टिक खाणार का?, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. 

नोटाबंदीचा निर्णय हा रिझर्व्ह बँकेचा नसून सरकारच्या ‘सूचने’वरून घेण्यात आल्याची बाब उघड झाली आहे. त्यामुळे मोदींच्यावर नोटाबंदीमुळे करण्यात येणाऱ्या टीकेत आणखीनच भर पडली आहे. ‘पाचशे रुपये व एक हजार रुपये चलनातून काढून घेण्याचा निर्णय सर्वतोपरी आमचाच होता’, असे रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे आजवर सांगण्यात येत होते; तसेच केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारही तसाच दावा करीत होते. 

मात्र, खुद्द रिझव्‍‌र्ह बँकेने अर्थविषयक संसदीय समितीपुढे याबाबतचा अहवाल सादर केला असून, ‘मोदी सरकारने केलेल्या ‘सूचने’मुळेच आम्ही हा निर्णय घेतला’, अशी कबुली बँकेने त्यात दिली आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या दाव्यातील विसंगती उघड झाली आहे. हा निर्णय रिझर्व्ह बँकेचा नव्हता, हे सिद्ध झाले आहे. हे म्हणजे वैयक्तिकरित्या काढलेले तुघलकी फर्मान आहे, अशी टीका माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली आहे. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin