Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


सरकारने नोटाबंदीची पूर्वकल्पना आरबीआयला दिली होती


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी)  - मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर आरबीआयने मोठा खुलासा केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाची केंद्र सरकारने एक दिवस आधी कल्पना दिल्याचे आरबीआयने सांगितले आहे. पहिल्यांदा नोटाबंदीचा निर्णय हा आरबीआयचा असल्याचे बोलले जात होते. मात्र त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

आरबीआयने दिलेल्या ७ पानांच्या दस्तावेजातून हे उघड झाले आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित असलेल्या ३ समस्यांना लगाम घालण्यासाठी ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्याचा सरकारने प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावात बनावट नोटा, दहशतवाद्यांना मिळणारा निधी, काळा पैशाचा उल्लेख आहे, असे या दस्तावेजात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या एका आठवड्यानंतर राज्यसभेत या विषयावरही चर्चाही झाली. त्यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाने या प्रस्तावाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर तो सरकारकडे आला आणि केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिली आणि  जुन्या नोटांवर बंदी घालण्यात आली, असे सांगितले होते. मात्र हा निर्णय आरबीआयने नव्हे, तर सरकारनेच घेतल्याचे दस्तावेजाच्या माध्यमातून समोर आले आहे.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin