Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


मोदींनीही मन मोठे करुन आई – पत्नी सोबत राहायला हवे - केजरीवाल


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीनुसार वयोवृद्ध आई आणि पत्नीला स्वतःसोबत राहू दिले पाहिजे. पंतप्रधानांचे निवासस्थान खूप मोठे आहे. मोदींनीही मन मोठे करुन आई – पत्नी सोबत राहायला हवे, असा सल्ला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. तसेच मी आपल्या आईसोबत राहतो, रोज त्यांचा आशीर्वाद घेतो. पण मी त्याचा गवगवा करत नाही, असेही केजरीवाल यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.   

गुजरात दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सकाळी लवकर उठून योगासन करण्याचे टाळून आपल्या आई हिराबा यांची भेट घेतली. मोदींच्या या भेटीवर  अरविंद केजरीवाल यांनी ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे. या ट्विटच्या माध्यमातून केजरीवाल यांनी मोदींना आई आणि पत्नीला सोबत राहायला नेण्याचा सल्लाच दिला. आणखी केजरीवाल म्हणाले, मी माझ्या आईला राजकारणासाठी बँकेच्या रांगेत उभे करत नाही. 

नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत गेल्या होत्या. त्यावेळीही केजरीवाल यांनी मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी मुक्कामास आहेत. तर त्यांच्या मातोश्री मेहसणा येथे भावासोबत राहतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मेहसाणा येथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin