Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


काळा पैसा पांढरा करण्यात सहकारी बँकांची महत्वाची भूमिका - आयकर विभाग


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी सहकारी बँकांनी महत्वाची भूमिका निभावली, असा निष्कर्ष आयकर विभागाने केलेल्या तपासणीतून समोर आला आहे.   सहकारी बँकांनी नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा करण्याचे काम केल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे. आयकर विभागाच्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर रेाजी ५०० व १००० रूपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले होते. या गैरव्यवहारात अनेकांचे लागेबंधे दिसून आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. या बँकांनी मोठ्या चातुर्याने काळा पैसा पांढरा करण्याचा मार्ग अवलंबला होता.

राजस्थानमधील अलवर येथील एका बँकेच्या संचालकांनी ९० लोकांच्या नावाने कर्ज काढले आणि ८ कोटींचा चुना लावल्याचे आढळून आले होते. तर व्यवस्थापनाने दोन कोटी रूपयांचे व्यक्तिगत बेहिशेबी पैसा पांढरा करण्यासाठी वापरला. जयपूर येथील एका सहकारी बँकेत दीड कोटी रूपये बँकेच्या क्लिअरिंग रूममधील एका कपाटात सापडले. आयकर विभागाने अनेक शहरांतील बँकांचे लॉकर तपासले असता मोठ्याप्रमाणात रोकडे आढळून आली. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, सूरत आणि जयपूर येथील बँकांचा यामध्ये समावेश आहे.

नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही दिवसांत जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये मोठ्याप्रमाणात ५०० व १००० रूपयांच्या नोटांच्या स्वरूपात रक्कम जमा झाली होती. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने मध्यवर्ती बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली होती. त्यामुळे केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेलाही टीकेला सामोरे जावे लागले होते. 

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin