Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


'त्या' विधानाप्रकरणी साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाची नोटीस


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ४ बायका आणि ४० मुले या संकल्पनेला पाठिंबा देणारे लोक जबाबदार आहेत, असे वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. एका कार्यक्रमादरम्यान साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या बोलण्याचा रोख हा मुस्लीम समाजाकडे होता. या व्यतिरिक्त ते तिहेरी तलाक पद्धतीविरोधातही बोलले. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साक्षी महाराजांकडून बुधवारपर्यंत खुलासा मागितले आहे.

या विधानावर साक्षी महाराज म्हणाले होते की, भारताची लोकसंख्या सध्या १३२ कोटी आहे. जर आपण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर लोकसंख्या प्रमाणाबाहेर जाईल. त्यासाठी आपल्याकडे कायदा हवा. कोणत्याही धर्माची महिला असेल तिचा आदर व्हायला हवा. त्यामुळेच ४ बायका आणि ४० मुले असा विचार सहन केला जाणार नाही.  

या प्रकरणी साक्षी महाराजांच्याविरोधात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधानाच्या २९८, १८८, २९५ ए, १३५ बी या कलमांनुसार तक्रार दाखल केली आहे. या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने मेरठ प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे साक्षी महाराज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin