Breaking News
 • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
 • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
 • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
 • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
 • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
 • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
 • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


अखेर मुलायमसिंह यादव यांची माघार


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - समाजवादी पक्षातील अंतर्गत कलहावर अखेर पडदा पडला आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अखिलेश यादवच असतील असे सांगत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकांच्या तोंडावर समाजवादी पक्षातील फूट टळली आहे. अखिलेश यांच्यासोबत पक्षाचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त आमदार असल्याने मुलायम सिंह यांना माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. दरम्यान, भाजपने पक्षातील वाद हा पितापुत्रांतील स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

सोमवारी पक्षचिन्हावर दावा करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी दोन्ही गटांनी कागदपत्रांचे गठ्ठे निवडणूक आयोगाकडे सादर करत आपली दावेदारी मजबूत केल्याने सपा फुटण्याच्याच मार्गावर होती. 

आयोगाला कागदपत्रे सादर केल्यानंतरही मुलायम यांनी समेटाचे संकेत दिले होते. अखिलेश माझा मुलगा आहे. आमच्या दोघांत काहीच मतभेद नाहीत. मात्र, एका व्यक्तीमुळे पक्षात काही वाद आहेत, असेही ते म्हणाले. त्यांचा इशारा रामगोपाल यादव यांच्याकडे होता. त्यानुसार रामगोपाल यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, असे पत्र उपराष्ट्रपती कार्यालयाला पाठवले आणि दुसरीकडे सायकल चिन्हावरील दावा मागे घेतला. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin