Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


काश्मीरमध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार


Main News

श्रीनगर, दि. १० (पीसीबी) -  बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि जवानांच्या चकमकीमध्ये १ दहशतवादी ठार झाला आहे. बांदीपोरा मधील पराय मोहल्ला हाजीनमध्ये दहशतवादी लपले असल्याचे माहिती मिळताच सुरक्षा दलाने शोध मोहीम राबवली. त्यावेळी दहशतवादी आणि जवानांध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. यावेळी एक भारतीय जवान गंभीर जखमी झाल्याचेही वृत्त आहे,  मात्र अद्याप या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही.  
 
सोमवारी पहाटे जम्मू जवळ अखनूरमधील जनरल रिझर्व्ह इंजिनीअरिंग फोर्सच्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंधाराचा फायदा घेत हल्ला केला होता. यात तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. 

या घटनेनंतर जम्मू काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. सीमा रेषा ओलांडून आलेले दहशतवादी राज्यात हल्ले करु शकतात, असा इशाराच गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. अखनूरमध्ये हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. यावरुन ते ज्या मार्गाने भारतात आले त्या मार्गाने परतही गेले असतील, असे मत गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने व्यक्त केले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin