Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -देश


माजी कर्णधार सौरव गांगुलीला जीवे मारण्याची धमकी


Main News

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) - मेदिनीपूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात भाग घेतल्यास जीवे मारण्यात येईल, अशी धमकी टीम इंडियाचा माजी कर्णधार व बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष सौरव गांगुली याला देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र सौरव गांगुलीला ७ जानेवारीला मिळाले असून याची माहिती गांगुलीने पोलीस आणि आयोजकांना दिली आहे.  

येत्या १९ जानेवारी रोजी जिल्हा क्रीडा संघाद्वारे मेदिनीपूर विद्यापीठात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या कार्यक्रमात सामील होण्याबाबत अद्याप त्याने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

गांगुली म्हणाला, कार्यक्रमात सहभागी होण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. हा एक ‘लाइव्ह शो’ होणार आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमात जाणार की नाही तुम्हा सर्वांना समजेल असेही तो म्हणाला. बंगाल क्रिकेट संघटनेच्या बैठकीनंतर गांगुलीने याची माहिती माध्यमांना दिली. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याबाबत संघटनेने बैठकीचे आयोजन केले होते.

 एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुलीला हे पत्र झेड अली नावाच्या एका व्यक्तीने दिले आहे. हा व्यक्ती कोण आहे. याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. त्याचबरोबर आशिष चक्रवर्ती यांना भेटायचे नाही, असेही पत्रात म्हटले आहे. आशिष चक्रवर्ती हे बंगाल क्रिकेट संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी आहेत.

सौरव गांगुली राज्यात क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ते विविध प्रयत्न करत आहेत. त्यासाठी राज्यभरात ते विविध कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. त्यासाठी ते विद्यापीठ, क्लब आणि राज्यस्तरीय क्रिकेटमध्ये राज्य संघटनेच्या वतीने पुढाकार घेत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin