Breaking News
  • जवान चंदू चव्हाणच्या कुटुंबीयांनी घेतली केंद्रीय मंत्री सुभाष भामरेंची भेट
  • हुशार विद्यार्थ्यांना लॅपटॉपसोबतच स्मार्टफोनही देऊ - अखिलेश यादव
  • मुंबई महानगरपालिका युतीसाठी मुख्यमंत्री पुढाकार घेणार नाहीत
  • तामिळनाडू - राज्यातील काही भागात जल्लिकट्टूच्या आयोजनास सुरुवात
  • पाकिस्तानमधील सिंध प्रांतात चीनविरोधात निदर्शने
  • आंध्रात रेल्वे अपघात - ३६ ठार, १०० जखमी
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


न सांगता घराबाहेर गेला म्हणून आई-वडीलांनीच मुलाला दिले चटके


Main News

चिंचवड, दि. ११ (पीसीबी) – न सांगता घराबाहेर खेळण्यासाठी गेला म्हणून चिंचवडमधील निष्ठूर आईने आणि सावत्र वडिलाने आपल्याच साडेपाच वर्षाच्या मुलाला चटके दिले. तसेच काठी आणि बुटाने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १०) चिंचवडमधील रामनगर येथे घडली. याप्रकरणी आई-वडिलाविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विराज बालाजी अष्टुळे  असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई कोमल बालाजी अष्टुळे (वय २६) आणि सावत्र वडील किशोर लक्ष्मण बनसोडे (वय २६, रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच किशोर याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी वाकडेवाडी येथील सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सविता चंद्रकांत दिवटे (वय ४०, रा. पाटील इस्टेट, वाकडेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल ही स्कूलबसमध्ये, तर किशोर हा सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करत आहे. कोमलचे यापूर्वी लग्न झाले असू, तिला विराज आणि आणखी एक मुलगा आहे. तिने एक वर्षापूर्वी किशोर याच्यासोबत दुसरे लग्न केले आहे. घरी न सांगता विराज मंगळवारी घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. तो उशिरापर्यंत घरी परत न आल्यामुळे त्याचा आई-वडिलांनी शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. विराज हा विद्यानगरमध्ये राहणाऱ्या त्याच्या आत्याकडे गेला होता. 

तो उशीरा घरी परत आला. त्यावेळी चिडलेल्या कोमल आणि किशोर याने विराजला कागद पेटवून त्याचे चटके दिले. तसेच काठीने व बुटाने बेदम मारहाण केली. त्यात विराजच्या पायाला मार लागला असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin