Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन


Main News

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - संस्कार प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणाऱ्या राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे रविवारी ( दि.८) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, मंदा आमटे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत. 

हा कार्यक्रम चिंचवड येथील बिजलीनगर, विश्वेश्वर ज्ञानदिप मंडळ येथे सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.

यावेळी डॉ. शांताराम कारंडे, सतिश पाटील,अरुण बोऱ्हाळे, करुणा चिंचवडे, रविंद्र चव्हाण, दिपक शेलार, सुवर्णा शिंदे, गणेश कदम, प्रशांत हंबर (समाजरत्न पुरस्कार) विनोद पवार (उत्कृष्ट् पत्रकारिता ), डॉ. किरण जोशी (डॉक्टररत्न ), राजेंद्र वाघ (कवीरत्न ), जगन्नाथ शिंदे (कृषीरत्न ), प्रसन्ना पद्‌मवार (उद्योगरत्न ), बालशाहीर  चैतन्य काजुळकर (कलागौरव ) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. शाताराम कारंडे (अध्यक्ष पांडुरंग प्रतिष्ठान मुंबई) गोविंद दाभाडे (सचिव नवनगर शिक्षण संस्था ), अर्जुन ठाकरे (मा.सभापती शिक्षण मंडळ), राजाभाऊ गोलांडे (नगरसेवक), घनश्याम चिंचवडे (अध्यक्ष विश्वेश्वर मंडळ) विजय भोसले (दैनिक केसरी मुख्य वार्ताहार), ललीता सबनीस (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ.एस.एस चितलांगे ( प्रा.डी.वाय पाटील फार्मसी कॉलेज) शिवरामकृष्णन (हेड.टाटा मोटर्स) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin