Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


काळेवाडीत वाहनांची तोडफोड करणारा तरुण गजाआड


Main News

चिंचवड, दि. ५ (पीसीबी) - शस्त्राचा धाक दाखवून वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तरूणाला गजाआड करण्यात आले. हा प्रकार बेबीज स्कूल समोर तापकीरनगर, काळेवाडी येथे बुधवारी (दि.४) पहाटे अडीच वाजता घडला. 

याप्रकरणी सुरज ज्ञानेश्वर शिंदे (वय २४) तापकीरनगर, काळेवाडी व  त्याच्या दोघा साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत कदम (वय ३५) रा. तापकीरनगर, काळेवाडी यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज शिंदे व त्याच्या दोन साथीदारांनी हेंमत याला बेबीज स्कूल समोर अडवून तलवार व लाकडी दांडक्याचा धाक दाखवत घरासमोरील पार्क केलेली अॅटो रिक्षाची (क्रमांक –एमएच १२/ एफ झेड ५२९१) काच व इतर दुचाकी व चारचाकी वाहनांचा तोडफोड केली. तसेच शस्त्राचा धाक दाखवून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी केलेल्या वाहनांच्या तोडफोडीत एकूण ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाकड पोलिस अधिक तपास करत आहे.
 
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin