Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


व्यवसायात पैसे गुंतविण्यास लावून सांगवीतील तरूणाची दहा लाखांची फसवणूक


Main News

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) - व्यवसायामध्ये पैसे गुंतविल्यास ४ ते ५ कोटी रुपये मिळतील, असे सांगून सहा जणांनी नवी सांगवीतील तरुणाची ९ लाख ७० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे.  हा प्रकार पुण्यातील सेनापती बापट रोड येथे घडला.

याप्रकरणी सिद्धार्थ अरुण हरले (वय २८, रा. जुनी सांगवी) आणि टिनू वाधवानी (रा. बालेवाडी) याच्यासह इतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश साने (वय २८, रा. नवी सांगवी) याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सिद्धार्थ आणि टिनू या दोघांनी 'क्युनेट' नावाच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतविल्यास ४ ते ५ कोटी रुपये मिळतील, असे माने याला सांगितले. त्यासाठी माने याला बँकेचे ४ लाख रुपयांचे कर्ज घ्यायला लावले. हे पैसे दोघांनीही स्वतःच्या बँक खात्यात जमा करून घेतले. त्यानंतर माने याला कोणतेही पैसे न देता त्याची ९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केली. सांगवी पोलिस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin