Breaking News
 • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
 • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
 • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
 • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
 • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
 • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


डांगे चौकाजवळ मोटारीच्या दरवाजाचा धक्का लागून दुचाकीवरील महिलेचा मृत्यू


Main News

चिंचवड दि.४ (पीसीबी) – थेरगाव डांगे चौक येथे मोटारीचा दरवाजा अचानक उघडल्याने दुचाकीला धक्का लागून दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी आठ वाजता घडली. 

सपना भगवान गाढे (वय ३५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ मोहन आढाव (वय ३६, रा. वाघोली) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संबंधित मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना भगवान गाढे या त्यांचा चौदा वर्षांचा मुलगा शुभम याला घेऊन थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये कामानिमित्त दुचाकीवरून चालल्या होत्या. डांगे चौकातील उड्डाणपुलाजवळील लक्ष्मीनगर बसथांब्याजवळ वळण घेत असताना कारचालकाने (एमएच १२ एनबी ३४७९) समोर गाडी थांबवून अचानक गाडीचे दार उघडले. त्यामुळे सपना गाढे यांच्या दुचाकीला धक्का बसला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांचा मुलगा शुभम हा गंभीर जखमी झाला. वाकड पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin