Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवड मतदारसंघातील भाजपच्या इच्छुकांच्या सोमवारी थेरगावमध्ये मुलाखती


Main News

चिंचवड, दि. १ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून इच्छुक असलेल्यांची सोमवारी (दि. २) मुलाखत घेण्यात येणार आहे. थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजता मुलाखतीला सुरूवात होणार आहे. या मुलाखतीदरम्यान इच्छुकांची शैक्षणिक पात्रता, जनमानसातील प्रतिमा, सामाजिक बांधिलकी, पक्ष संघटनेतील कार्य, राबविलेले लोकोपयोगी उपक्रम, त्यांच्यामागे असणारे कार्यकर्त्यांचे पाठबळ याबाबत माहिती घेतली जाणार आहे. 
  
भाजपच्या निवडणूक कार्ड कमिटीचे सदस्य पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महिला मोर्चा शहराध्यक्षा शैला मोळक, खासदार अनिल शिरोळे, अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन, आमदार महेश लांडगे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे आदी इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. 

सकाळी नऊ वाजता प्रभाग क्रमांक १६ किवळे रावेत त्यानंतर प्रभाग क्रमांक १७ वाल्हेकरवाडी-दत्तनगर, सकाळी अकरा वाजता प्रभाग क्रमांक १८ केशवनगर-चिंचवडगावठाण, प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी-विजनगर, प्रभाग क्रमांक २३ शिवतीर्थनगर-पडवळनगर, प्रभाग क्रमांक २४ गणेशनगर-पद्मजी पेपरमिल, प्रभाग क्रमांक २५ पुनावळे-वाकड, प्रभाग क्रमांक २६ पिंळेनिलख-वेणूनगर, प्रभाग क्रमांक २७ श्रीनगर-रहाटणी, प्रभाग क्रमांक २८ पिंपळेसौदागर, प्रभाग क्रमांक २९ पिंपळेगुरव-सुदर्शननगर, रात्री साडेसात वाजता प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी आणि रात्री साडेआठ वाजता प्रभाग क्रमांक ३२ सांगवीमधील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin