Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


वाकड व पिंपळेनिलख भागातून मेट्रो प्रकल्प नेण्याची मागणी


Main News

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – शिवाजीनगर ते हिंजवाडी मेट्रो प्रकल्प वाकड, विशालनगर, पिंपळेनिलख, कास्पटेवस्ती या परिसरातून नेण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका आरती चोंधे,  नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, ममता गायकवाड यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात या सर्वांनी आमदार जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  “शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाला पीएमआरडीएने नुकतीच मंजुरी दिली आहे. या मार्गामुळे हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या हजारो चाकरमान्यांची चांगली सोय होणार आहे. औंध ते हिंजवडी या रस्त्यावरील वाहतुककोंडीतुन वाहनचालकांची व नागरीकांची सुटका होणार आहे तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्यास मदत होईल. हा मेट्रो प्रकल्प  वाकड, विशालनगर, पिंपळेनिलख, कास्पटेवस्ती या भागातील नागरीकांनाही सार्वजनिक वाहतुकीसाठी सोयीचा ठरावा. या भागात हिंजवडीतील आयटी पार्कमध्ये काम करणारे चाकरमानी मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे या सर्वांच्या सोयीसाठी वाकड, विशालनगर, पिंपळेनिलख, कास्पटेवस्ती या भागातून शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प नेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin