Breaking News
  • पुणे - माजी महापौर बंडू गायकवाड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
  • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोदींशी आज रात्री फोनवरुन साधणार संपर्क
  • संजय निरुपम पक्षाच्या हिताचे काम करत नाहीत - गुरुदास कामत
  • नोटाबंदीसंदर्भातल्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत
  • नवी दिल्ली - धुक्यामुळे २५ ट्रेन उशिरा धावणार
  • प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट
  • कोलकाता - इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वन डेत भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


हिंजवडी, मारूंजीत वाहन अपघातात दोघांचा मृत्यू


Main News

हिंजवडी, दि. ३० (पीसीबी) – हिंजवडी ते मारूंजी रस्त्यावर इंडिका कार आणि रिक्षा टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात टेम्पोमधील एक महिला आणि एक पुरुष अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला. आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास मरुंजीजवळ हा अपघात झाला.
 
सोनाली अशोक भालेकर (वय ३०, रा. चांदखेड, ता. मावळ), एकनाथ वामन सोनटक्के (रा. पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी कारचालक रवींद्र शिंदे (वय २८, रा जांबे, ता. मुळशी) याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनटक्के हा आपला मालवाहू टेम्पो घेऊन हिंजवडीच्या दिशेने जात होता. त्यावेळी मारुंजीजवळील महाविद्यालयासमोर इंडीका कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत असताना मालवाहू टेम्पोला समोरुन धडकली. या अपघातात टेम्पोमधील दोघांचाही मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin