Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवडमधील पतपेढीच्या संचालक मंडळाने लाटला कामगारांचा पीएफ


Main News

चिंचवड, दि. ३० (पीसीबी) – चिंचवड येथील औद्योगिक विकास नागरी सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) रक्कमेवर डल्ला मारला आहे. पतपेढीच्या कर्मचाऱ्यांच्या  खात्यावर पीएफ रक्कम न भरता एकूण ३ लाख ४२ हजार ४२० रुपये लाटले आहेत. या पतपेढीचे एकूण १३ संचालकांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
पतपेढीचे अध्यक्ष मधुकर काशिनाश पाचपांडे (वय ५७, रा. सेक्टर क्रमांक ३५९, प्राधिकरण, निगडी), उपाध्यक्ष रेवानंद केवजी भिरुड (वय ६०, रा. महेशनगर, संत तुकारामनगर, पिंपरी), सचिव शिवाजी किसन जगताप (वय ५०, रा. सेक्टर क्रं १९, प्लॉट क्रं ३३, नंददिप कोयनानगर, चिखली), संचालक सुरेश रामचंद्र बगडे (वय ५६, रा. रक्षक सोसायटी जवळ, पिंपळे निलख), संचालक कौतीक एकनाथ जंगले (वय ५९, रा. सेक्टर क्रं २५, प्लॉट क्रं. ३२, स्वामी समर्थ मंदिराजवळ, निगडी प्राधिकरण), संचालक गोविंद कृष्णा काळे (वय ५९, रा. दत्तवाडी, आकुर्डी), संचालक सोनाजी देवराम प्रधान (वय ५५, रा. पत्रा शेड चाळ, लिंक रोड, पिंपरी), संचालक किरण दिपक देसाई (वय ३८, रा. ३२०, २१ गल्ली क्रं २, ढोरेनगर, जुनी सांगवी), संचालक वसंत हरिभाऊ पठारे (वय ५६, रा. युनिटी पॅराडाईज, सर्वे क्रं २८, वानवडी), तज्ञ संचालक महेंद्र मनोहर भुजंग (वय ४८, रा. ५४/५, सिंधुनगर, निगडी), तज्ञ संचालक वसंत गिरीधर सोनवले (वय ५९, रा. गुलाबनगर, धनकवडी), संचालक विमल वामन पाटील (वय ५८, रा.प्रशांत हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, चिंचवड) व सुशिल हरी पाटील (वय ३८, रा. सेक्टर क्रं २७, प्राधिकरण निगडी) अशी या १३ संचालकांची नावे आहेत. याप्रकरणी राजेशकुमार सिंह (वय ४२, रा. शिवगंगा सोसायटी, बी. ४०२, कोंढवा) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील औद्योगिक विकास नागरी सहकारी पतपेढी कर्मचाऱ्यांचा १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१६ या कालावधी दरम्यानचा भविष्य निर्वाह निधी संचालक मंडळाने त्यांच्या खात्यावर जमा केला नाही. संचालक मंडळाने एकूण ३ लाख ४२ हजार ४२० रुपयांची लुट केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पिंपरी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin