Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


आम्ही चिंचवडकर विचार मंचच्या वतीने १५० जणांना लायसन्स वाटप


Main News

चिंचवड, दि.२९ (पिसीबी) – आम्ही चिंचवडकर विचार मंचच्या वतीने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजना व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ८ वी ते १२ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.  

चिंचवडगावातील मोरया प्रसाद हॉलमध्ये मंचचे अध्यक्ष अॅड. मोरेश्वर शेडगे यांनी हा कार्यक्रम घेतला. ड्रायव्हिंग प्रशिक्षण योजनेतील १५० प्रशिक्षणार्थींना लर्निंग लायसन्स वाटप आणि महापालिका योजनेअंतर्गत ८ वी ते १२ मधील १७५ गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत सायकल मंजुरी पोचपावती वाटप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रकाशराव मिठभाकरे आणि भाजपचे जेष्ठ नेते ज्ञानेश्वर शेडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सामाजिक समरसता मंचाचे बबन गाढवे, भाजपाचे उपाध्यक्ष पाटीलबुवा चिंचवडे, शेजल पार्क सोसायटीचे अध्यक्ष सुभाष माने, काकडे पार्क सोसायटीचे सचिव राजन पाटील, माजी नगरसेवक अशोक पारखी, राजेंद्र गावडे, मधुकर बच्चे, प्रदिप सायकर, माधुरी गुरव, मयुरी कुलकर्णी, पुजा सराफ, सागर चिंचवडे, अलका पांडे, सोपान चिंचवडे, गोपाळ कळमकर, प्रविण शिंदे, पांडुरंग चिंचवडे, राजाभाऊ सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी राघू चिंचवडे, अजित कुलथे, स्वप्निल शेडगे, संकेत वाघमारे, विकी बागल, भाग्यश्री मोरे, राजेंद्र पवार, ऋषीकेश लांडगे, अक्षय खरात यांनी परिश्रम घेतले.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin