Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


सांगवीमध्ये रविवारी अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन


Main News

चिंचवड, दि.२९ (पिसीबी) - रमेशदादा बागवे प्रतिष्ठानच्या जुनी सांगवी येथे १ जानेवारी रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी सांगवी, पवारनगर येथील सिद्धेश्वर पॅलेसमध्ये हा कार्यक्रम होईल. त्यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच युवा किर्तनकार ह.भ.प.संतोष पायगुडे यांच्या किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

युवक काँग्रेसचे मावळ लोकसभा सचिव शेषेराव कसबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शिताळे यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वासुदेव मातुलकर यांना जीवन गौरव, महेश भागवत यांना समाजभूषण, दत्तात्रय ढोरे, अशोक सुतार, अरूण शिंदे, मारुती मडके, नारायण मडके, ह.भ.प. गोविंद राणे, व दिगंबर गोरे यांना वारकरीभूषण तसेच आदेश ढोरे यांना खेळरत्न, रमेश मोरे यांना झुंझार पत्रकार, तर गणेश यादव व गोपाळ बिरारी यांना गुणवंत कामगार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
 
यावेळी महापौर शकुंतला धराडे, शांतीब्रम्ह कुरेकर महाराज, चंद्रकांत छाजेड, अविनाश बागवे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता कांबळे, नरेंद्र बनसोडे आदी उपस्थित असतील.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin