Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवडमध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा; सचिन साठेंच्या हस्ते केले ध्वजारोहण


Main News

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) - देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि दिनदुबळ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपला सरकारला सत्तेतून हद्दपार करण्याची गरज आहे. ती जबाबदारी आता काँग्रेसच्या युवा पिढीवर आली आहे. देशातील जनतेला खरा इतिहास सांगण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी योगदान द्यावे असे आवाहन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले. 

काँग्रेस पक्षाच्या स्थापनादिनानिमित्ताने चिंचवड, चापेकर चौकात सचिन साठे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवा सरचिटणीस चिंतामणी सोंडकर, चिंचवड युवा अध्यक्ष मयूर जैयस्वाल, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे सचिव राजेंद्रसिंग वालिया, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, ॲड. क्षितिज गायकवाड, सज्जी वर्की, हिरामण खवळे, बाबा बनसोडे, उमेश बनसोडे, सचिन कोंढरे, अनिरुध्द कांबळे, सचिन निंबाळकर, चंद्रशेखर जाधव, तानाजी काटे, नितीन कांबळे, राजन नायर, इर्शाद शेख, बाळू जगताप, आबा खवळे, नंदा तुळसे आदी उपस्थित होते. 

साठे म्हणाले, “देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते भूमीपूजन करून हिंदुस्थान ॲन्टीबायोटिक्स या कारखान्याची उभारणी झाली. या कारखान्यामुळे पिंपरी-चिंचवडचा औद्योगिक विकास झाला. मात्र, भाजप सरकारच्या धोरणामुळे एचएसह सर्व औद्योगिक पट्ट्यातील कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. शहराचा नावलौकीक होण्यासाठी नेहरूनगर येथील कंपनीच्या जागेचा वापर व्हायला हवा. ही जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्राधिकरण व एमआयडीसी सारख्या शासकीय, निमशासकीय संस्थांनी विकत घेऊन तेथे सर्वसामान्य नागरीकांना उपयोगी ठरतील, असे विकास प्रकल्प राबवावेत अशीही मागणी त्यांनी केली.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin