Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


काळेवाडीतून दोघा दुचाकी चोरट्यांना जेरबंद; १० दुचाकी ताब्यात


Main News

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) - काळेवाडी परिसरात वाहन चोरी व चेनस्नॅचींग प्रकरणाचा छडा लावत असताना तपास पथकाने संशयितरित्या दुचाकीवरून फिरणाऱ्या दोघा दुचाकी चोरट्यांना जेरबंद केले. या दोघांनी शहरातील विविध ठिकाणाहून दहा दुचाक्या चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई  चिंचवड पोलिसांनी शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास काळेवाडी येथील चित्तराव गणपती मंदिराजवळ केली.

याप्रकरणी चिंचवड पोलिसांच्या शोधपथकाने चंद्रकांत राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. चांडवली फाटा, ता. खेड) व त्याचा साथीदार विठ्ठल अशोक उंबरे (वय ३२. रा. नाणेकर वाडी, यशवंत कॉलनी, चाकण) या दोन चोरट्यांना अटक केली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२५) सायंकाळी पाचच्या सुमारास चिंचवड पोलिसांचे चोरी व चेनस्नॅचींगचे शोधपथक काळेवाडी येथील चित्तराव गणपती मंदीरासमोरून जात होते. त्यावेळी त्यांना विना नंबर प्लेट दुचाकीवरून  जाताना दोन तरूण आढळले. यावर पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला व त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे गायकवाड व उंबरे असे सांगितले. मात्र दुचाकीबाबत सखोल चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांची कसून चौकशी केली असता ती दुचाकी त्यांनी दारुच्या नशेत चोरली असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी शहरातील विविध भागातून अशा एकूण १० दुचाकींची चोरी केली असल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्याच्याकडील १० दुचाकी ताब्यात घेतल्या असून त्याची किंमत जवळपास चार लाख १५ हजार इतकी आहे. चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin