Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


हिंजवडीत सोनिगरा ज्वेलर्समधून १ लाख ४० हजाराच्या सोन्याच्या अंगठ्या लंपास


Main News

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – हिंजवडी येथील नामांकीत सोनिगरा ज्वेलर्स या सराफ दुकानातून एका चोरट्याने तब्बल १ लाख ४० हजार रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. ही घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी तीन ते सव्वा तीनच्या सुमारास घडली.

याप्रकरणी किरण जैन (वय ४७, रा. चिंचवडगाव) यांनी एका अनोळखी इसमाविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीतील दिलीप सोनीगरा ज्वेलर्स  या दुकानात गुरुवारी (दि.२२) दुपारी तीन ते सव्वातीनच्या सुमारास एक अनोळखी इसम सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. त्यावेळी त्याने दुकानातील १ लाख ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या हातचालाखीने चोरून नेल्या. ही बाब लक्षात येताच जैन यांनी पोलिसांत धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्हीत त्या तरुणाचे चित्रीकरण स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यास पोलिसांना अडचण येत आहे. हा तरूण २८ ते ३० वयोगटातील आहे. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin