Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


थेरगावात शालेय विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन


Main News

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - शालेय वयात मूले ऐकण्या आणि बोलण्याबरोबर वाचती आणि लिहिती झाली पाहिजेत. मुलांसमोर प्रेरणा मिळेल, स्फूर्ती मिळेल असे साहित्य मांडले पाहिजे. मुलांना  बालवयापासूनच त्यांचे अनुभव, भावना, विचार, मते, कल्पना जमेल तसे मांडण्याची संधी दिल्यास त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे लक्षात येईल, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले यांनी व्यक्त केले.

थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयात आयोजित बाल साहित्य निर्मिती महोत्सवात साहित्य प्रकाशन प्रसंगी बोलत होते. यावेळी प्राचार्य यशवंत पवार, पर्यवेक्षक धनंजय साबळे, क्रीडाशिक्षक रमेश कदम, भीमराज शिरसाठ,संजय शितोळे, बिपीन देशमुख आदी उपस्थित होते.  

नाना शिवले म्हणाले, “बुद्धिमत्ता आणि कल्पकता वेगवेगळी असते. कल्पक आणि बुद्धिमान व्यक्तीमुळेच समाज विकसित होतो. ज्या लोकांना नवनवीन कल्पना सुचतात त्याच लोकांकडून समाजाची खरी प्रगती होत असते. प्रत्येक मुलाकडे कोणती ना कोणती कल्पकता असतेच. फक्त कल्पक मुलांची ओळख करुन घेता आली पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी अशा बालसाहित्य मेळाव्याची गरज आहे. शाळाशाळांमधून अशा साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम व्हायला पाहिजेत.”

प्राचार्य यशवंत पवार म्हणाले, “अभ्यासाबरोबरच मुलांमध्ये साहित्याची गोडी निर्माण करून कविता, गाणी, गोष्टी, कथा लिहिण्यास प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. बालसाहित्य चळवळीतून वाचनसंस्कृती वाढवून मुलांना लिहिते केले पाहिजे. मुलांना लहान वयातच त्यांच्या आवडीनुसार त्यांची मते व्यक्त करण्याची संधी दिल्यास त्यातून चांगले साहित्य व साहित्यिक निर्माण होण्यास मदत होईल."

यावेळी तेजस्विनी मोहोळकर(शाळेतील कविता), स्नेहल शिंदे(आईने बनवलं), योगेश चव्हाण (माझी कविता), तनुजा वालगुडे (मनातील कविता), ऋतुजा मोराळे (कविता), गणेश अय्यर (ओळख थोर नेत्यांची), विशाल चंदन (बाकावरची कविता) यांनी स्वत: लिहिलेल्या पुस्तकातील लिखाणाबाबत आपली मते मांडली. मुलांनी लिहिलेल्या साहित्यांचे प्राचार्य यशवंत पवार, नाना शिवले व शिक्षकांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख भीमराज शिरसाठ, रमेश कदम, अरुणा यशवंते, बिपीन देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जान्हवी सपकाळे या विद्यार्थीनीने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैतन्य निकते यांनी केले. महेश वाघमोडे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी रमेश कदम, संजय शितोळे, पांडुरंग दिवटे, उमेश आगम, अर्जुन शेटे, भीमराज शिरसाठ, दादा शेजाळ, विजय जाधव, दिलीप माळी, दत्ता उबाळे, पुरुषोत्तम पाटील, बिपीन देशमुख, अरुणा यशवंते, अर्चना कदम यांनी परिश्रम घेतले. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin