Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


वाल्हेकरवाडीत बॉम्ब सापडला; एकाला अटक


Main News

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी पुण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. चिंचवड, वाल्हेकरवाडी येथे हा बॉम्ब सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 

विश्वनाथ गणपत साळुंखे (वय ५८, रा. औदुंबर कॉलनी, चिंचवड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साळुंखे यांच्या घरात ही स्फोटके आढळली आहेत. 

एक व्यक्ती एका महिलेला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत असल्याचा फोन चिंचवड पोलिसांना शुक्रवारी (दि. २३) संध्याकाळी आला होता. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. बॉम्बशोधक पथकाने विश्वनाथ साळुंखेच्या घराची झडती घेतली असता तिथे कमी तीव्रतेची स्फोटके आढळून आली. सुरूवातीला फोन करून यासंबंधी माहिती देणारा व्यक्ती हा मनोरूग्ण असल्याचे पोलिसांना वाटले होते. पोलिसांनी विश्वनाथ साळुंखेला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. त्याने ही स्फोटके कुठून व कशासाठी आणली याचा तपास केला जात आहे. याप्रकरणी विश्वनाथ साळुंखेवर गुन्हा दाखल झाला आहे.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin