Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


थेरगाव येथील रुग्णालयातील कामगाराला लुटणाऱ्या तिघांना अटक


Main News

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयाच्या कामगारास चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तिघांना चिंचवड पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि.२०) संध्याकाळी साडेआठच्या सुमारास थेरगाव येथील बिर्ला हॉस्पिटल समोरील रस्त्यावर घडली.

याप्रकरणी नितेश वरकडे (वय २४, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय बबन कसबे (वय १९, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), शाम रावण लांडगे (वय १९, रा. जय मल्हार कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड), ऋषीकेश रमेश सुरवसे (वय २६, रा. हरी सुपर मार्केट शेजारी, तापकीरनगर, काळेवाडी) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय व शाम हे दोघे नितेश याच्यासोबत थेरगाव येथील अदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये महिन्याभरापूर्वी कामाला होते. त्यानंतर त्यांनी काम सोडून दिले होते. मंगळवारी संध्याकाळी नितेश जेवण करुन हॉस्पिटलच्या समोरील रस्त्यावर फेरफटका मारण्यास गेला होता. त्यावेळी तेथे अक्षय व शाम त्यांचा मित्र ऋषीकेश याच्यासोबत आले. ऋषीकेश याने नितेश याला चाकूचा धाक दाखवला. तर अक्षय याने त्याच्या खिश्यातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. त्यात एटीएम व रोख रक्कम सोळा हजार रुपये होते. तसेच शाम याने नितेशला शिवीगाळ करत एटीएमचा कोड सांग, नाहीतर ठार मारील, अशी धमकी दिली. त्यानंतर ते पाकीट व एटीएम घेवून पसार झाले. दरम्यान या तिघांनाही पोलिसांनी अटक केली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin