Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवड येथे हप्त्याची मागणी करून हॉटेल कामगारांना बेदम मारहाण


Main News

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) - मालकाला ५० हजाराचा हप्ता देण्यास सांगा, अन्यथा हॉटेल चालू देणार नाही, अशी धमकी देऊन हॉटेलमधील कामगारांना बेदम मारहाण करून त्यांना डांबून ठेवण्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.१७) चिंचवड एमआयडीसी सर्व्हे क्रं ६५ येथील गायत्री हॉटेल आणि दत्ता फॅब्रिक्रेटर्स कंपनी येथे घडली.

मनुश नारायण देवाडिगा, महेश पाईकराव, सचिन राठोड असे मारहाण करण्यात आलेल्या हॉटेल कामगारांची नावे आहेत. या प्रकरणी सोमनाथ काळभोर व त्याचे इतर दोन साथीदार (सर्व रा. एम.आय.डी.सी चिंचवड) यांच्या विरोधात गायत्री हॉटेलचे मालक राजु शेट्टी (वय ४४, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सोमनाथ काळभोर व त्याचे इतर दोन साथीदार चिंचवड एमआयडीसी येथील राजु शेट्टी यांच्या मालकीच्या गायत्री हॉटेल येथे आले. यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत तुमच्या मालकाला मला दरमहा ५० हजार रुपये हप्ता द्यायला सांगा. अन्यथा हॉटेल चालू देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच यावेळी त्यांनी हॉटेलमधील टेबल खुर्च्यांची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी हॉटेलात काम करत असलेल्या मनुश, महेश, सचिन यांना लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच त्यांना चिंचवड येथील दत्ता फ्रॅब्रिक्रेटर्स या कंपनीत १७ ते १९ डिसेंबर दरम्यान डांबून ठेवले. 

दरम्यान, सोमनाथ काळभोर व त्याचे इतर दोन साथीदार सध्या फरार असून निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin