Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


सांगवीत दुचाकीच्या अपघातात दोघा मित्रांचा मृत्यू


Main News

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – जुनी सांगवी येथे जुभाजकाला धडकून दुचाकीला झालेल्या अपघातात त्यावरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा घपघात रविवारी (दि. १८) उशीरा रात्री दीड ते अडीचच्या दरम्यान जुनी सांगवीतील औंध पोस्ट ऑफीससमोर घडला.
 
दिनेश हरपालसिंग कुमार (वय २४, रा. आदर्शनगर, हिंजवडी. मूळ रा. पंजाब) व त्याचा मित्र राजेशकुमार सुरेशकुमार (वय २४, रा. ३९२, सकाराया भिंड, मध्य प्रदेश) असे अपघातात मृत्यूमूखी पडलेल्या दोन तरुणांची नाव आहेत. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार गोविंद शंकर लेंभे यांनी फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश आणि त्याचा मित्र राजेशकुमार दोघेही दिनेशच्या दुचाकीवरुन रविवारी उशीरा रात्री दिड ते अडीचच्या दरम्यान जुनी सांगवी येथील रक्षक चौकाकडून औंधकडे जाणाऱ्या रोडवरून औंध पोस्ट ऑफीससमोरुन जात होते. त्यावेळी गाडी चालविणाऱ्या दिनेशचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि बीआरटीच्या सिमेंट ब्लॉक दुभाजकाला धडकली. त्यामुळे दोघेही खाली पडले. त्यात दिनेश आणि त्याचा मित्र राजेकुमार याचा जागीच मृत्यू झाला. पोलिस निरीक्षक नितीन लांडगे तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin