Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


डांगे चौकात महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ व धक्काबुक्की


Main News

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या कारणाने दुसरीकडे जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरुन एका बांगड्या विक्रेत्या महिलेने हिंजवडी वाहतूक शाखेतील महिला वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करुन मारहाण करत बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. १८) दुपारी दोनच्या सुमारास मथ्थाबाई डांगे बॅडमिंटन हॉल समोरील रोडवरील थेरगाव, डांगे चौक  येथे घडला.
 
याप्रकरणी माणमधील एका २३ वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता बाळीशा अंबरगी (पोलिस हवालदार, हिंजवडी वाहतूक शाखा) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता अंबरगी या हिंजवडी येथील वाहतूक शाखेच्या हवालदार आहेत. त्या रविवारी दुपारी दोनच्या सुमारास डांगे चौक येथे कर्तव्यावर हजर असताना त्यांना बॅडमिंटन हॉलसमोर एक महिला बांगड्या विकण्यास बसली असल्याचे अढळले. त्याचा वाहनचालकांना अडथळा होत होता. त्यामुळे वाहतूक पोलिस लता यांनी त्या महिलेला दुसरीकडे जाण्यास सांगितले. त्यावरून ती महिला चिडली आणि लता यांना अपशब्द वापरून धक्काबुक्की करत त्यांना बघून घेण्याची धमकी दिली. वाकड पोलिस तपास करत आहेत.  

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin