Breaking News
  • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


वाकड येथे मोटारीने धडक दिल्याने बांधकाम व्यावसायिक ठार


Main News

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) - भरधाव मोटारीची दुचाकीवरून निघालेल्या बांधकाम व्यावसायिकाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) सकाळी साडेअकराच्या सुमारास वाकड येथील भूमकर चौकात घडली.
 
राजेश भगवान टाक (वय ४८, रा. कोथरूड, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचे बंधू अशोक अमरशी टाक यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पंकज अशोक पाटील (वय २२, रा. वाल्हेकरवाडी) या मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाक यांचे तळेगाव दाभाडे येथे गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. शनिवारी सकाळी ते तळेगावाकडे जात होते. त्या वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin