Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


चिंचवड, आनंदनगरधील तडीपार गुन्हेगाराला अटक


Main News

चिंचवड, दि. १६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातून तडीपार केल्यानंतरही पुन्हा शहरात आलेल्या चिंचवड, आनंदनगर येथील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १४) रात्री दळवीनगर येथे करण्यात आली.

अविनाश शंकर पवार (वय २५, रा. आनंदनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पवार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तरीही तो शहरात पुन्हा आला होता. याबाबत माहिती मिळताच बुधवारी रात्री त्याला ताब्यात घेण्यात आले. चिंचवड पोलिस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin