Breaking News
 • काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पतियाळा येथून उमेदवारी अर्ज दाखल
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज - चिंचवड


ताथवडे येथील इंदिरा शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहिम संपन्न


Main News

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक ५२ आणि ५३ मधील ताथवडे भागातील इंदिरा शाळा परिसरातील मैदान व रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे ५१ कर्मचारी आणि इंदीरा शाळेतील १०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी २ मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. इंदीरा शाळेतील विद्यार्थ्यांना आठवड्यातील दोन तास याप्रमाणे वर्षातील किमान १०० तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची शपथ देण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातील व्यावसायिकांनी मोकळ्या जागेत कचरा टाकु नये, कचरा कुंड्यांचा वापर करावा, दैनंदिन कचरा मनपाच्या घंटागाडीत टाकावा, असे आवाहन अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजली भागवत यांच्या वतीने करण्यात आले. 

यावेळी सहआयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे, सहाय्यक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, इंदिरा शाळेच्या प्राचार्या गीता पिल्ले, उपप्राचार्या स्नेहा सप्रे, मुख्य आरोग्य निरीक्षक राजेश भाट, आरोग्य निरीक्षक शेखर निंबाळकर, बापू गायकवाड, योगेश फल्ले आदी उपस्थित होते. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin