Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


एस्सेन ग्रुपच्या मोशी-चिखलीतील “ऐश्वर्यम हमारा” गृहप्रकल्पात मिळणार वाजवी किंमतीत घर


Main News

भोसरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडसारख्या विस्तारलेल्या शहरात एस्सेन ग्रुपने प्रत्येकाला घर मिळावे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित गृहप्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मोशी-चिखली रोडवर “ऐश्वर्यम हमारा” नावाने भव्य गृहप्रकल्प सुरू केला आहे. या गृहप्रकल्पात वाजवी किंमतीत आपल्या स्वप्नातील घर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे एस्सने ग्रुपचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल यांनी सांगितले. 

या गृहप्रकल्पाबाबत माहिती देताना भीमसेन अग्रवाल म्हणाले, “चिखली-मोशी येथे “ऐश्वर्यम हमारा” या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून १ बीएचके आणि २ बीएचके सदनिका उपलब्ध करून देत आहोत. १ बीएचके सदनिकेची किंमत १४ लाख ७० हजारांपासून सुरूवात आहे. तसेच २ बीएचके सदनिका २३ लाख ९० हजारांपासून सुरूवात आहे. त्याचप्रमाणे शासनाचे कर वेगळे आकारले जाणार आहे.”

एस्सेन ग्रुपचे संचालक सतीश अग्रवाल म्हणाले, “ऐश्वर्यम हमारा या गृहप्रकल्पात आपल्या स्वप्नातील घर घेताना पंतप्रधान आवास योजनेचाही लाभ घेता येणार आहे. या गृहप्रकल्पात एकूण १२ इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये एकूण दोन हजारापेक्षा अधिक सदनिकांचे सर्व सुविधायुक्त बांधण्याचे काम सुरू आहे. या गृहप्रकल्पात भव्य व प्रशस्त स्वीमींग पूल, भव्य गणेश मंदिर, नाना-नानी पार्क, आऊटडोअर जिम, वॉकिंगसाठी सुंदर लॉन, अॅम्फी थिएटर, नक्षत्र गार्डन, गॅस पाइपलाइन, मल्टीपर्पज हॉल, पार्टी लॉन, सिटिंग प्लाझा, इनडोअर गेम्स, मेडीटेशन हॉल, जॉगिंग ट्रॅक, योगा लॉन, हर्बल गार्डन, लहान मुलांसाठी प्ले ग्राऊंड, जिम आणि योगा हॉल, किड्स पूल यांसारख्या सर्व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.”

एस्सेन ग्रुपचे संचालक नरेंद्र अग्रवाल म्हणाले, “ऐश्वर्यम हमारा गृहप्रकल्पापासून भोसरी आणि एमआयडीसी परिसर काही मिनीटांच्या अंतरावर आहे. नाशिक फाटा आणि तळवडे आयटी पार्क केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. पिंपळेसौदागर, चाकण आणि चिंचवड केवळ २० मिनिटांच्या अंतरावर आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० मिनिटांच्या अंतरावर आहे. एसएनबीपी शाळा जवळच आहे. एस्सेन ग्रुप पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या १६ वर्षांपासून गृहनिर्माण क्षेत्रात काम करत आहे. या ग्रुपने केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे; तर पुणे व महाराष्ट्राच्या इतर भागातही आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या ग्रुपचे अध्यक्ष भीमसेन अग्रवाल यांनी अनेक दर्जेदार आणि सुसज्ज गृहनिर्माण प्रकल्प उभारले आहेत. आता ऐश्वर्यम हा गृहप्रकल्प सुरू केला आहे. या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या बुकिंगची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी बुकिंगसाठी ०९०२१३००८०० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin