Breaking News
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
  • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
  • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
  • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
  • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
  • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
  • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


वायसीएममधील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप


Main News

भोसरी, दि. ७ (पीसीबी) - वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या भोसरीतील एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करुन न घेता घरी पाठवले. घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
 
अरूधंती रमेश ढाकणे (वय ९ महिने) असे मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. अरूंधतीच्या मृत्यूला डॉक्टर हेच जबाबदार असल्याचा आरोप मुलीचे वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. 
 
रमशे ढाकणे हे भोसरी येथे राहतात. अरूंधतीची गुरुवारी (दि. ५) रात्री प्रकृती खालावली. तिचे वडील रमेश ढाकणे तिला वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. तेथे डॉ. शिल्पा रावडे यांनी अरूधंतीची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले. तसेच तिला रुग्णालयात दाखल करुन न घेता बाहेरुन औषधे आणून घरी पाठविले. घरी गेल्यावर तिची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला. वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे. अरूंधतीला वेळीच उपचार मिळाले असते तर ती बचावली असती. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin