Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


कुदळवाडीतील तरुणाचा व्याजाच्या पैशातून खून; तीन महिन्यांपूर्वी झाला होता बेपत्ता


Main News

भोसरी, दि. ६ (पीसीबी) – व्याजाने दिलेले पैसे वारंवार मागण्याचा तगादा लावल्याने व जास्तीचे व्याज लावून पैसे घेतल्याचा राग मनात धरुन कुदळवाडीतील तरूणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. हा खून २७ सप्टेंबर २०१६ रोजी कुदळवाडीतील बालघरेवस्ती येथे करण्यात आला.  

श्रीराम शिवाजी वाळेकर (वय २७, रा. बालघरे वस्ती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मेहबुब समीद उल्ला मनीयार (वय २६), समीद उल्ला अकबर अली मनीयार (वय ५४, दोघेही रा. पवारवस्ती चिखली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, श्रीराम हा गायब झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी श्रीरामच्या मोबाईल फोनवर झालेल्या संभाषणांची माहिती घेतली असता श्रीराम व मेहबुब यांचे एकमेकांशी बोलणे झाल्याचे निष्पन्न झाले. मेहबुब मनीयार याने श्रीराम वाळेकर यांच्याकडून व्यवसायासाठी ५ लाख रुपये कर्ज घेतले होते. ते परत देण्यासाठी श्रीराम यांनी वारंवार मागणी करुन पैशावर जास्तीचे व्याज घेतल्याचा राग मेहबूब याच्या मनात होता. त्यांच्यात वेळोवेळी भांडणे देखील झाली होती. मेहबुब मनीयार व समीद उल्ला अकबर मनीयार यांनी  २७ सप्टेंबर  रोजी श्रीराम याला त्यांच्या कुदळवाडी येथील गोडाऊनमध्ये बोलावून घेतले. त्याच्यासोबत व्याजाच्या पैशावरून वाद घातला. त्यानंतर त्याचा खून करुन पुरावा नष्ट केला. निगडी पोलिस तपास करत आहेत.


Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin