Breaking News
 • राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मुलाखतीसाठी अजित पवार सोलापुरात
 • जलिकट्टूवरील बंदी विरोधात तामिळनाडूमधील शाळा आजही बंद
 • नवी दिल्ली - दाट धुक्यामुळे ८ आंतरराष्ट्रीय आणि १४ देशांतर्गत उड्डाणे उशिराने
 • डोनाल्ड ट्रम्प आज घेणार अमेरिकेचे ४५वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ
 • इस्रोने अंतरिक्ष मंगळयानाची दिशा बदलण्याचा घेतला निर्णय
 • कर्मचाऱ्यांच्या सीटू संघटनेचा २० जानेवारीला देशव्यापी संप
 • कोल्हापूर - शासन धोरणाच्या विरोधात १५०० शाळा आज बंद
 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरीतील ओम हॉस्पिटलमध्ये पाच रुग्णांवर मोफत ह्दयशस्त्रक्रिया


Main News

भोसरी, दि. ३ (पीसीबी) – भोसरी येथील ओम हॉस्पिटलमध्ये अत्यल्प उत्पन्न असलेल्या पाच रुग्णांवर मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली. महागाईच्या काळात आरोग्य सेवा महाग होत असताना डॉ. सुनील अग्रवाल यांनी या नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान मिळवून दिले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. मनोज दुराईराज, डॉ. प्रशांत वाघमारे, डॉ. कन्हैय्या सराग यांनी मोलाचे सहकार्य केले.

ओम हॉस्पिटलमध्ये राम विश्वकर्मा (वय ६४), हनुमंत बापूराव दाभाडे (वय ६८), नाजीर जफर पटेल (वय४८), अर्जुन ससाणे (वय६०), रफीक रसूल शेख (वय५०) यांच्यावर यशस्वीपणे मोफत ह्दयशस्त्रक्रिया करण्यात आली.

याबाबत डॉ. सुनील अग्रवाल म्हणाले, “लायन्स क्लब आणि ओम मेडीकल फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली जाते. सर्जरीबरोबरच अँजिओप्लास्टी, पेसमेकर, बायपास, डायलेसिस, थॉयराईड आदी गंभीर स्वरुपाच्या आजारावर उपचार व शस्त्रक्रिया केली जाते. राज्यातील कोणताही केसरी किंवा पिवळा राशनकार्डधारक व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin