Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


चिखलीत गॅरेज मालकाला दहा हजारांच्या खंडणीसाठी मारहाण


Main News

भोसरी, दि. २ (पीसीबी) – चिखली, मोरेवस्ती येथे पाच जणांनी गॅरेज मालकाला दहा हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (दि.१) दुपारी चारच्या सुमारास घडली.

विजय सुनील कुंजीर (वय १९, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार दिनेश कोळी, आकाश शिनगारे, राहुल खवळे आणि रोहित जुजगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अस्लम अब्बास शेख (वय ३५, रा. चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांचे चिखलीतील मोरेवस्तीत जमीर मोटर्स या नावाने गॅरेज आहे. रविवारी दुपारी ते आपल्या गॅरेजमध्ये बसले होते. त्यावेळी आरोपी धारदार हत्यार घेऊन गॅरेजमध्ये आले. त्यांनी शेख यांच्याकडे दहा हजार रुपयांची खंडणी मागितली. तसेच खंडणी न दिल्यास गॅरेज चालवू देणार नाही असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच दिनेश कोळी याने शेख यांच्या नाकावर व तोंडावर लाकडी दांडक्याने माराहण केली. हे पाहून शेख यांचे भाऊ अस्लम, वडील अब्बास, आई रेहमान, पत्नी कौसर हे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. निगडी पोलिस तपास करत आहेत. 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin