Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


भोसरीत रस्ता दुभाजकाला धडकून काळेवाडीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू


Main News

भोसरी, दि. (पीसीबी) – भोसरीत भरधाव दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू, तर सहप्रवासी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी दोनच्या सुमारास फिलिप्स चौकात घडली.

 

अंबादास शिवाजी जाधव (वय ३३, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रद्धानंद खेलजे (वय ३२, रा. लांडेवाडीभोसरी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबादास आणि श्रद्धानंद हे दोघे रविवारी दुचाकीवरून जात होते. अंबादास हा दुचाकी चालवत होता, तर श्रद्धानंद पाठीमागे बसला होता. भरधाव जात असताना भोसरीतील फिलिप्स चौकात अंबादास याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी रस्ता दुभाजकाला जाऊन जोरात धडकली. त्यात अंबादास याचा जागीच मृत्यू झाला. श्रद्धानंद जखमी झाला आहे. एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

 

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin