Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


चिखलीतील आगीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याची मागणी


Main News

भोसरी, दि. ३१ (पिसीबी)- चिखली भागातील भंगार गोदामांना लागणाऱ्या आगीमुळे वायू प्रदुषणात वाढ झाली आहे. गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीमुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहोचत असून यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी माजी नगरसेवक राहुल जाधव यांनी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे केली आहे.

चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती हा भाग अनाधिकृत भंगार, गोदामे यांनी व्यापला आहे. पेट्रोलियम युक्त पदार्थ, थर्माकॉल, लाकडे, पेपर अशा प्रकारचे लवकर पेट घेणाऱ्या वस्तू  या गोदामांमध्ये ठेवण्यात आले आहेत. तसेच रासायनिक पदार्थ, कारखाने, शॉपमध्ये उत्पादनावर होणारी प्रक्रिया आणि प्रक्रियेनंतर नद्यामध्ये पाणी सोडले जाते. त्यामुळे वायू प्रदुषण व जल प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी या भागात रोगराई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. भंगार गोदामांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. यावर महापालिकाने योग्य ती कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे, अशी मागणी त्यांनी आहे.”

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin