Breaking News
  • युनायटेड किंग्डमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
  • गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांची यादी मतदान केंद्राच्या बाहेर लावणार - जे.एस.सहारिया
  • हुबळी स्थानकाजवळ मालगाडीचे ५ डबे रुळांवरून घसरले
  • बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन विस्कळीत
  • नवी दिल्ली - आज सकाळी ७ च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले
  • काँग्रेसचे नारायण दत्त तिवारी आणि मुलगा रोहित शेखर आज करणार भाजपमध्ये प्रवेश
  • नोटाबंदी - काँग्रेसचा आज जंतरमंतर ते आरबीआयच्या कार्यालयापर्यंत मोर्चा
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज पश्चिम बंगाल, झारखंडच्या दौऱ्यावर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


मोशीतील कंपनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कमेचा अपहार


Main News

भोसरी, दि. २९ (पीसीबी) - मोशीतील त्रिमूर्ती असोसिएट्स या कंपनीच्या महिला संचालिकेने कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीतून २९ हजारांची अपहार केल्याचे समोर आले आहे. या महिलेने कामगारांचा सहा महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी कपात करून तो भरलाच नाही. याप्रकरणी संबंधित महिला संचालिकेविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोजकुमार असरानी (वय ३७, रा. रावेत, प्राधिकरण) यांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी-आळंदी रस्त्यावर त्रिमुर्ती असोसिएट्स ही कंपनी आहे. या कंपनीच्या महिला संचालिकेने कंपनीतील कामगारांचा जानेवारी, मार्च, एप्रिल, जून, जुलै व ऑगस्ट या सहा महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी न भरता कामगारांची एकूण २९ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. महिला संचालिकेला अद्याप अटक झालेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin