Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


वीज कर्मचाऱ्याला धमकाविल्याप्रकरणी दिघीतील महिलेवर गुन्हा


Main News

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – वीजबील थकीत कारणामुळे मीटर बंद करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकाविल्याप्रकरणी दिघीतील एका महिलेविरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. २७) दुपारी अडीचच्या सुमारास दिघी गावठाण येथे घडली.
 
सुनंदा हनुमंत वाळके (रा. दिघी गावठाण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अजित म्हस्के(वय ३६, रा. भोसरी) या कर्मचाऱ्याने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा वाळके या महिलेच्या घरी महावितरणचे वीज दिली आहे. परंतु, त्यांनी विजेचे बिल भरलेले नाही. त्यामुळे अजित म्हस्के हे मंगळवारी (दि. २७) दुपारी अडीचच्या वाळके यांच्या घरी जाऊन वीज मीटर कापून नेत होते. त्यावेळी वाळके यांनी म्हस्के यांना दारात अडवले आणि मीटर पुन्हा त्याच ठिकाणी न जोडल्यास घराबाहेर जाऊ देणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या म्हस्के यांनी पुन्हा त्याच जागेवर वीजमीटर बसविला. त्यानंतर वाळके यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली. दिघी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin