Breaking News
 • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
 • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
 • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
 • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
 • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
 • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
 • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
 • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
 • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


तळवडेत ट्रकने वृध्दाला चिरडले; ट्रक चालकाला अटक


Main News

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – तळवडे येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकच्या जोरदार धडकेत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास तळवडेतील त्रिवेणीनगर चौकात घडली.
 
शिवाजी कृष्णा देवकर (वय ६०, रा. घर क्रमांक ४६२, राम मंदिराजवळ, त्रिवेणीनगर, तळवडे) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वृध्दाचे नाव आहे. सुरेंद्र बहादूर महावीर यादव (वय ४४, रा. जय कॉपीजवळ, नांदी चौक, चाळ क्रंमांक २५, खडकी बाजार) या ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नवनाथ देवकर (वय ३०, रा. त्रिवेणीनगर, निगडी) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२६) सायंकाळी सहाच्या सुमारास तळवडे येथील त्रिवेणीनगर चौकातून शिवाजी देवकर हे पायी जात असताना रस्ता ओलांडत होते. यावेळी विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. निगडी पोलिस तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

 • Twitter

 • Ads
 • Pimpri Chinchwad Bulletin