Breaking News
  • निवडणूक आयोगाने जो निर्णय देईन तो मान्य करू- मुलायम सिंह यादव
  • मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्या लांबी येथे आयोजित सभेत गोंधळ
  • काँग्रेसची आघाडीसंदर्भात दादर येथील टिळक भवनात बैठक सुरू
  • गोवा विधानसभेसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध
  • मुंबई - युती संदर्भात आज सेना-भाजपची बैठक
  • जीएसटीची अंमलबजावणी लांबणीवर; १ जुलैपासून लागू
  • उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे १४९ उमेदवार जाहीर
  • उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपाची ६४ उमेदवारांची यादी जाहीर
  • कोलकाता - इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या मुख्यालयाला आग
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७
Pimpri Chinchwad Bulletin

न्युज -भोसरी


मोशीत मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार


Main News

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – मोशी प्राधिकरणातील स्पाईन रोडवर मोटारीने अचानकपणे व कोणताही इशारा न देता ब्रेक दाबल्याने मागून येणारा दुचाकी स्वार त्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि २६) रात्री पावने दहाच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथील स्पाईन रोडवर झाला.

संदिप बाबुराव पाटील (वय ३७, रा. बोऱ्हाडे वस्ती, मोशी) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ प्रदिप पाटील (वय ३५) याने अनिकेत सोपानराव सपकाळ (रा. यमुनानगर, निगडी) याच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप पाटील हे सोमवारी (दि. २६) मोशी प्राधिकरण येथील स्पाई रोडवरुन त्यांच्या बोऱ्हाडे वस्ती येथील राहत्या घरी जात होते. त्यावेळी त्याच्या समोरील बाजूस अनिकेत सपकाळ हे आपल्या मोटारीने वेगाने जात होते. त्यावेळी अचानक त्यांनी कोणताही सिग्नल व इशारा न देता ब्रेक मारला. यावेळी मागून दुचाकीवरून येणारे संदिप पाटील हे सपकाळ यांच्या मोटारीवर जोरात आदळले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत घटना स्थळावरुन फरार झाला असून पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Pimpri Chinchwad Bulletin: Pimpri News, Chinchwad News, Bhosari News

App Notification

Social

  • Twitter

  • Ads
  • Pimpri Chinchwad Bulletin